Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

करिअर म्हणून सर्व्हेअर हा एक चांगला पर्याय. (Surveyor as a Career a Best Option)......

करिअर मराठी नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्व्हेअर म्हणून एक चांगला व्यवसायाच्या दृष्टीने चांगलं  करिअर पर्याय कसे निवडता येईल ते यामध्ये सांगत आहे. 

 सर्व्हेअर 
   सर्व्हेअर हा असा व्यक्ती आहे जो सर्व प्रकारच्या आकाराची शेत जमिनीचे, चढ-उतार युक्त असलेल्या व असमान पृष्ठभाग असलेल्या जमिनीचे ठराविक आकाराच्या प्लॉटची मोजणी करण्यासाठी नेहमीच्या वापरात असलेले टेप वापरून बिल्डींग, धरणाचे, नगररचना, नगरातील रस्ते, यांचे मोजमाप करण्यासाठी तेथील अडथळ्यांचा अजिबात परिणाम होणार नाही अश्या तऱ्हेने मोजमाप करून त्या ठिकाणचा नकाशा अथवा आराखडा तयार करतो.   
                                                                              

        सर्व्हेअर हा राज्य, देश अशा स्वरूपाच्या मोठया प्रमाणात असलेल्या भूभागाचे नकाशे तयार करतो. सर्व्हेअर हा भारतामध्ये 'SURVEY OF INDIA DEPARTMENT' या भारत सरकारच्या उपक्रमात काम करू शकतो. सर्व्हेअर हा पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक स्थळाचे मोजमाप करू शकतो. 

        सर्व्हेअरचे कोर्स आपण औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात करू शकतो. हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे. हा कोर्स आधी दोन वर्षाचे होते पण आत्ता एक वर्षाचा झालेला आहे. या कोर्स मध्ये प्रवेश घेण्याकरिता कमीत कमी दहावी असायला पाहिजे. या कोर्स मध्ये प्रवेश घेण्याची सुरुवात दहावीचा परिणाम घोषित झाले की जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया औद्यीगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे सुरु केली जाते. 

        या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना स्थलांतरित नकाशे (Topographical Map), कॅडस्ट्रल नकाशे (Cadastral Map), इंजिनीरिंग नकाशे, मिलिटरी नकाशे (Military Map), समोच्च नकाशे (Contour Map), भौगोलिक नकाशे (Geodetic Map), भूवैज्ञानिक नकाशे (Geological Map), GIS (Geo-Information System) आणि पुरातत्वीय नकाशे (Archaeological Map) तयार करतो तसेच त्याची संरचना कशी दिसेल ते देखील तयार करतो. 
 
        यामध्ये आरेखकाचे देखील काम शिकविले जाते. आरेखक कोण असतो ते माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये पाहू शकता.
   
        या व्यवसायात देखील आपण आपले चांगले करिअर घडवू शकतो. या कोर्सनंतर तुम्ही थेट दुसऱ्या वर्षाला पदविकेत (Diploma in Civil Engineering) मध्ये प्रवेश घेऊ शकता. खूप अश्या कंपन्या आहेत ज्यामध्ये  सर्व्हेअर म्हणून आपण काम करू शकतो अथवा स्वतःचे काम घेऊ शकतो. 

        या व्यवसायाला सरकारी नोकरी मध्ये सुध्दा खुप संध्या आहेत. जसे सर्वेक्षक  म्हणून नगररचना विभाग (Town Planning Department), जलसंधारण विभाग (Irrigation Department), महानगर पालिका (Municipal Corporation), भूजल विभाग (Ground Water Department), सुधार प्रन्यास विभाग (Improvement Trusts) आणि कोळसा खाण (Coal Field Ltd) येथे काम करू शकतो.







Post a Comment

0 Comments