Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आरेखक स्थापत्य अथवा यांत्रिकी हा करिअर म्हणून चांगला पर्याय. (Draughtsman Civil/Mechanical as a career a good option.)

करिअर मराठी नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आरेखक म्हणून एक चांगला व्यवसाय म्हणून करिअरकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून हा लेख लिहिण्याचे कारण हेच की खूप विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण  झाल्या नंतर काय करावे एक तर अकरावी आणि बारावी किंवा डिप्लोमा किंवा औद्योगिक प्रशिक्षण. आरेखक स्थापत्य अथवा यांत्रिकी हा करिअर म्हणून चांगला पर्याय. 

आरेखक

आरेखक हा आराखडे किंवा नकाशे तयार करणारा व्यक्ती असतो.हा व्यक्ती घरे, इमारती, रस्तेपूल, लोहमार्ग, जलसिंचन आणि नगररचना, यांत्रिकी गियर, मोटरचे भाग वेगवेगळ्या प्रकारचे यांत्रिक आराखडे किंवा नकाशे तयार करतो. आरेखकाचे दोन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे.

1- आरेखक स्थापत्य  (Draughtsman Civil)

2- आरेखक यांत्रिकी  (Draughtsman Mechanical)


आरेखक व्यवसाय निवडत असतांना या बाबी लक्षात घ्यावयाला हव्या त्या खालीलप्रमाणे आहेत.

1. तुम्हाला आरेखक म्हणजे काय माहिती आहे का ?

2. तुम्हाला खरंच ड्रॉईंगची आवड आहे का ?

3. तुम्हाला हा कोर्स पूर्णपणे मराठीमध्ये आहे हे माहिती आहे का ?

4. हे सर्टिफिकेट कोर्स आहे हे तुम्हाला माहिती आहे का ?

5. या सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झाल्या नंतर काय ?

6. या कोर्स नंतरचे करिअर काय ?

7. यानंतर इंजिनीरिंग मध्ये करिअर आहे का ?     

आरेखक स्थापत्य किंवा यांत्रिकी हा एक प्रकारचा इंजिनीरिंगचाच भाग असतो फरक एवढाच की इंजिनीयर डिग्री घेतलेला आणि आरेखक हा सर्टिफिकेट घेतलेला असतोआरेखक स्थापत्य किंवा यांत्रिकी सर्टिफिकेट कोर्स हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविले जाते. 

हा कोर्स दोन वर्षाचा असून यामध्ये चार सेमिस्टर असतात. या कोर्स मध्ये प्रवेश घेण्याची सुरुवात दहावीचा परिणाम घोषित झाले की जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये सुरु होतात.

या कोर्सची वैशिष्ठे हे आहेत की यामध्ये आपण बिल्डींग ड्रॉईंग, धरण, रस्ते, पूल, लोहमार्ग, मशीनचे गिअर, मोटर आणि वेगवेगळ्या मोटर्स इत्यादींचे ड्रॉईंग काढणे शिकविले जाते. 

यामध्ये सर्व्हेअरचे देखील काम शिकविले जाते. सर्व्हेअर कोण असतो ते माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये पाहू शकता.

या व्यवसायात आपले खूप चांगले करिअर घडवू शकतो यात काहीच शंका नाही. हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही एक तर पदविकेला (Diploma in Civil/Mechanical Engineering) म्हणजेच पॉलीटेक्निकला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये ड्राफ्ट्समन म्हणून सुद्धा काम करू शकतात किंवा तुम्ही स्वतःचे काम सुद्धा घेऊ शकतात. एकंदरीत तुम्ही ठरवु शकता की समोर काय निवडायचं इंजिनीरिंग किंवा जॉब किंवा स्वतःचे काम.

या व्यवसायाला सरकारी नोकरी मध्ये सुध्दा खुप संध्या आहे. जसे नगररचना विभाग (Town Planning Department), जलसंधारण विभाग (Irrigation Department), महानगर पालिका (Municipal Corporation), भूजल विभाग (Ground Water Department), बांधकाम विभाग (Public Work Department) सुधार प्रन्यास विभाग (Improvement Trusts) इत्यादी मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून काम करू शकतो.

Post a Comment

0 Comments