करिअर मराठी नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला इंजिनीरिंग डिप्लोमा म्हणून एक चांगली संधी या दृष्टीने चांगलं करिअर म्हणून पर्याय निवडता येईल का ?
इंजिनीरिंग डिप्लोमा
मित्रांनो डिप्लोमा तर सर्वांनाच माहिती असेलचं. यात कोणकोणत्या ब्रांच आहे हे देखील सर्वांना माहिती असेलचं. मग त्यात नवीन काय असा देखील प्रश्न सर्वाना पडला असेल नाही का ? पण यात करण्यासारखं भरपूर काही आहे हे तुम्हाला माहिती असेल अथवा नसेल पण मला जे माहिती आहे ते कोणाच्या तरी उपयोगी येईल अश्या प्रकारे मी यात लिहितो आहे.
इंजिनीरिंग डिप्लोमा हे चांगले पर्याय आहेच यात काही शंका नाही. डिप्लोमा मध्ये खूप विभाग आहेत जसे की
१. स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering)
२. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका (Diploma in Mechanical Engineering)
३. संगणक अभियांत्रिकी पदविका (Diploma in Computer Engineering)
४. एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदविका (Diploma in Aeronautical Engineering)
५. रासायनिक अभियांत्रिकी पदविका (Diploma in Chemical Engineering)
६. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदविका (Diploma in Software Engineering)
७. विद्युत अभियांत्रिकी पदविका (Diploma in Electrical Engineering)
८. इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदविका (Diploma in Electronics Engineering)
९. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन्स अभियांत्रिकी पदविका (Diploma in Electronics & Telecommunications Engineering)
असे भरपूर प्रकारचे विभाग आहेत, या विभागांत प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी पास असायला पाहिजे. डिप्लोमाचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो. तर डिप्लोमा मध्ये थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठीची शैक्षणिक अर्हता ही किमान बारावी पास किंवा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया ही दहावीचा परिणाम घोषित झाला की जून महिन्यात प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होते. तसेच थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी वेगळा वेळापत्रक तयार केला जातो तो बारावीचा परिणाम घोषित झाला की प्रवेश प्रक्रिया सुरु होते यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण केलेले विद्यार्थी सुद्धा याच प्रकारे प्रवेश घेऊ शकतो.
या तीन वर्षात विद्यार्थांना तांत्रिक (Technical) कोर्स जे इंजिनीरिंगला खूप महत्वाचा आहे ते शिकविले जाते. या डिप्लोमामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक किंवा नोकरीशी संबंधित इंजिनीरिंग किंवा अभियांत्रिकी ज्ञान, वैज्ञानिक कौशल्ये (Scientific Skills), संगणकीय व गणितीय तंत्र, चांगल्याप्रकारे कार्यक्षेत्रावर संवाद कसा साधावा आणि त्या क्षेत्रातील समस्या कश्या सोडवाव्या याचे शिक्षण दिल्या जाते.
पदविका ही स्टेट बोर्ड टेकनिकल एज्युकेशन (State Board Technical Education) उदा. (Maharashtra State Board Technical Education) प्रदान करते. डिप्लोमा झाल्यानंतर आपण थेट इंजिनीरिंगला दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळवू शकतो.
डिप्लोमाच्या नंतर शासकीय (Government) किंवा खासगी (Private) क्षेत्रात पण खूप जास्त संध्या उपलब्ध होत आहेत. जसे की कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, सहयोगी अभियंता, तंत्रज्ञ, फोरमन, आरेखक, सर्वेक्षक, संगणक अभियंता, माहिती तंत्रज्ञान अभियंता, विद्युत अभियंता इत्यादी प्रकारचे कामे करू शकतो.
तुम्हाला माझं लेखन आवडलं असेल तर कृपया शेअर करा. या लेखनाचा कोणत्या तरी विद्यार्थ्याला फायदा वजा मदत होईल धन्यवाद!!!!!!!!
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.